• 0

    Shares
  • Likes
0 Shares
0 Likes
Share

 

सखे पापण्यांच्या कडा रेखताना
खुळ्या आरश्याने कुठे जायचे
लळा लावला तू खुळ्या आरश्याला 
आता काजळाने कुठे जायचे.....?

हां शेर वाचला की बहुतेक मुलींच्या गालावरची गुलाबी लाली चडणार नाही असे होऊच शकणार नाही. एकतर काजळ आणि ओठांवर चडवलेली लिपस्टिक ही खऱ्या अर्थाने एका मुलीच्या सौंदर्यात बहार आणते. मात्र याचा अर्थ मुळीच असा होत नाही की मूली छान दिसत नाही. त्या छानच दिसतात. पण डोळ्यात भरलेल काजळ आणि तीच्या ओठांवरची लाली चेहऱ्यावर हल्कीशी खुमारी आणते यात कुणाच दुमत नसेल. आपण आजवर पाहत आलोय की मुलींच्या सौंदर्याची विविध रूप कवी, लेखक, गितकरांनी त्यांच्या लिखानातून शब्दबद्ध केली आहेत. तीच्या ललनिय देहरूपाची प्रचिती आपल्याला कविता गझल गाणी आणि चित्रपट या माध्यमातून मिळते पण या स्त्रीच्या सौंदर्याचे आविष्कार रूपांचा काल्पनाबाह्य विचार केला तरी देखील तितकिच आकर्षणीय आणि हवी हवी शी वाटणारी असते. 

आता हेच बघा ना, एखाद्या स्त्रीचा कमनीय बांधा तुम्हाला आकर्षित करु शकतो. तर एखाद्या स्त्रीचे मृगनयनी डोळे तुम्हाला भुरळ घालु शकतात. त्यातल्या त्यात तीच्या जादुयी नजरेत कैद होण्याची इच्छा कित्येक बघ्यांची असते. आणि महत्वाच म्हणजे गुलाबाच्या पाकळी सारखे मधाळ ओठ चाखायची हौस ही मनात कुठे तरी दडलेली असतेच. आता आपण मूळ मुद्यावर येवूयात...... जर यावरच आपण एक रियलिटी चेक नजर टाकलित तर माझ्या मित्र मैत्रिणीनो तर आपल्या लक्ष्यात येईल की आज प्रत्येक स्त्री आणि मुलगी तीच्या सौंदर्यावर अपार प्रेम करते आणि केलच पाहिजे... तीला ही सौंदर्य जपण्याचा आणि तीचा आदर करण्याचा हक्क आहे. ती ही जाणून गेली की शारीरिक आकर्षण आणि वैचारिक आकर्षण यांचा दुवा म्हणजेच सौंदर्य...! आजच्या दगदगी आयुष्यात देखील छान दिसावे या मताशी सलग्न असणाऱ्या माझ्या मैत्रिणी मला सगळी कड़े वावरताना दिसतात. अर्थात तीच्या आयुष्यात तिने आनंदित राहाव आणि समोरच्याला आनंद द्यावा हीच खरी नात्यामधली अल्हादायक गोष्ट असते असे मला मना पासून वाटते. आता हेच बघा न... मी सगळ्यां माझ्या मैत्रिणी ना पाहते त्यांच्या कड़े काजळ आणि लिपस्टिक असतेच. पण हल्लीच्या दैनंदिन दिनक्रमा मुळे तितकासा पुरेसा वेळ मिळत नाही. सकाळी ऑफिस ला जाताना अंघोळ करून मग केसांचा बुचडा गुंडाळून धावत्या ट्रेन च्या मार्गावर असते. त्यात सकाळी असलेली फ्रेशनेस ट्रेन च्या धावपळीत कुठल्या कुठे निघुन जाते.

विरार-चर्चगेट च्या लोकल मधे तर तीचा पार चोथा होऊन जातो. मग जस जशी हळू हळू गर्दी कमी होऊन क्लेम केलेल्या सिट वर बसते तेव्हा ती निवांत सुस्कारा सोडते. आणि मग येव्हाना सुकून गेलेल्या चेहऱ्यावर नजर टाकावी म्हणून पर्स किंवा बॅगे मधून छोटासा आरसा काढ़ते. त्यानंतर कॉम्पैक पाउडर ने चेहरा दुरुस्त करून डोळ्यात काजळ पेंसिल ने तीच्या मृगनयनी कड़ा रेखत नव चैतन्य डोळ्यात चमकावतशी ती चमकते. मग ओठावर सूट होणाऱ्या स्किन टोन प्रमाने लिपस्टिक चा शेड बघून ओठांवरची सुकुमार पाकळ्या रंगवते. भुरकट केसांवर कंगवा फिरवत क्लिप ने बांधून स्वतः च्या सौंदर्याची स्तुती करावी अशी हळूच हसते... ही लगबग त्या ट्रेन मधे सगळ्याच स्त्रीया करतात. आणि मग शेवटी आल्या स्टेशन वर उतरून विथ कॉन्फिडेंस ने रैंप वॉक करत हवेच्या वेगात आपल ऑफिस गाठतात. हां त्यांचा नट्ट पट्टा निहाळताना मला मात्र जाम कौतुक वाटत. मी एक स्त्री असण्याची पाऊती मला माझ स्वतः च सौंदर्य देते याहून अप्रूप वाटणारी दूसरी गोष्ट या जगात नाही.
हे सौंदर्याच विश्लेषण इथेच थांबत नाही मित्रांनो... माझा एक मित्र आहे त्याने फक्त सहा शब्दात आख्या स्त्रीच्या सौंदर्याची कबुली दिली आहे. अहो, त्याने तर चक्क तीच्या ओठाना कोंकण च्या हापुस आंब्या ची चव आहे अशी उपमा दिली. "तीचे ओठ आहेत की कोकण चा हापुस आंबा"..... म्हणजे तीच्या रसाळ ओठांची चव चाखने म्हणजे थेट हापुस आंब्याची च चव चाखल्या सारखे आहेत... असे काहीसे म्हणने असावे बुआ.....

सौंदर्याच पारण फेडणारे बरेच असतात. स्त्रीच्या वाट्याला तर सौंदर्याच अमाप खजिना च मिळाला आहे की काय अशी प्रचिती येते. खर तर या जीवसृष्टित स्त्री पुरुष संबधात या सौंदर्या मुळे पुरुषांच्या मनात प्रेम आणि वासना यांचा जन्म होतो. आणि या मिलनात सौंदर्या चा मोलाच्या वाटा असतो हे स्वीकारण आवश्यक आहे. 
खरचं कधी कधी वाटत की समुद्रा प्रमाणेच सौंदर्याला सुद्धा भरती येत असावी...कारण कधी कधी होत काय की मी तिला दररोज पहात असतो...परंतु एखाद्या दिवशी ती अशी काही दिसते जणू काही मी तीला पहील्यांदाच पहात आहे आणि जसजसे तिला आजुण पाहात जावे तसतसे तिचे सौंदर्य अजुन खुलत जाते...अगदी डोळ्यातही साठवता येणार नाही असे...

एखादी स्त्री जरी नजरे आड़ झाली तरी बघणारे तीला वळून पाहण्याचा मोह टाळू शकत नाही. मात्र त्या नजरेत वासना आणि तीला मिळवण्याचा हट्टहास असेल तर त्या स्त्री चा आणि तीचा सौंदर्याच्या अपमान ठरू शकतो. पण असे फार कमी पुरुष असतात की ते त्या सौंदर्याला डोळ्यात साठवून तीला जपतात. मनाच्या एका गाभाऱ्यात तीला पूजतात. मित्र हो तुमच्या नजरेतून तीच्या सौंदर्याच रसभरित वर्णन करने म्हणजेच तीला मिळालेली खरी पोचपाऊती होय ! 
मी आणि माझ्या सारख्या कित्येक मैत्रिणी या पोचपाऊती ची अपेक्षा करतो. जाता जाता इतकंच सांगू शकते की आज ही "लिपस्टिक अंडर माय बुरखा" या दडपनात स्त्रीया तीच स्त्रीत्व स्विकारत नाही आहेत. त्यांच्या वतीने एवढं मांडते की आम्ही काजळ आणि लिपस्टिक ने स्वतः च्या स्त्री सौंदर्याची शोभा वाढवतो नाकि पुरुषी वासनेला आर्कषित करण्यासाठी..!

Share this article

Written By Monika Pawar

As a student in University of Mumbai’s School of Communication and Journalism, I am focusing on writing My concentration on social and Political stories.

Leave A Reply