• 0

    Shares
  • Likes
0 Shares
0 Likes
Share

 

स्त्रियांच्या मासिक पाळी चा विषय हां सर्वसामान्य नागरिकांमधे नेहमी विटाळ, अस्वच्छ म्हणुन समजला जातो. आणि त्या पद्धतीने दूषित दृष्टिकोण ठेवून यावर प्रतिक्रिया दिल्या जातात. मात्र यावर खुप कमी मंडळी आहेत जे 'मासिक पाळी' बाबत महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना, ऑफिसात काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांची नेमकी अडचण समजून त्यावर एक उत्तमरित्या मार्मिक सोलुशन शोधतात. त्यातलाच खालील फोटोतला प्रकार......

म्हणजे, जस आपण आता पाहतो की रेल्वे स्टेशन, एखाद स्कैन कार्नर वर कॉइन/रुपया टाकुन थंड पेय घेता येत किंवा आता तर प्लास्टिक च्या बॉटल्स च रीसायकल करण्यासाठी एक कपाटा सारखी मशीन उभी करण्यात आलेली आपण जागोजागी बघतो. हीच कल्पना स्त्रियांच्या प्रश्नांवर सुद्धा प्रत्यक्षात आणता येईल याच उत्तम उदाहरण म्हणजे इमरजेंसी मधे उपलब्ध करून देणारी पैड मशीन..!

फार फार मुंबई मधे फिरत असताना असल काही आम्हा मुलींसाठी उपलब्ध होईल अस कधीच पाहण्यात आल नाही. प्रवासात असताना प्रत्येक मुलीला प्रश्न सतावतो की, जर मला अवेळी मासिक पाळी आली तर?..... माझ्या कपड्यांवर डाग लागला तर? .....मला ही ! ..... मात्र या बाबत सगळी खबरदारी घेवुनच सगळ्यां महिला वर्गा ला घरातून बाहेर पडाव लागत. 
असो, त्या दिवशी पार्ले च्या साठे महाविद्यालयात परीक्षेच्या निमित्ताने जान झाल तेव्हा ही पैड मशीन मुलींच्या कॉमन रूम मधे बसवलेली पाहिली. थोड़ हसू आल पण समाधान वाटल की कुठे तरी "तीची" दखल घेतली एकदाची....

खर सांगायच झाल तर ही तर फक्त एक सुरुवात आहे. अजुन बरीच परिवर्तनाची गरज या समाजाला आहे. ही मशीन निश्चितच एक पहिल पाऊल म्हणता येईल. ज्या संकल्पनेतून ही मशीन बसवण्यात आली त्याच पुढाकाराने संबध मुंबई च्या सरकारी कार्य विभागात, हॉस्पिटल्स, सार्वजनिक शौचालयात आणि शाळां मधे ही पैड मशीन उपलब्ध झाली पाहिजे. जेने करून कुठलीच महिला मासिक पाळी बाबत संकुचित भावना बाळगणार नाही

Share this article

Written By Monika Pawar

As a student in University of Mumbai’s School of Communication and Journalism, I am focusing on writing My concentration on social and Political stories.

Leave A Reply